हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी भाजप नेते मुन्ना यादव यांचा उल्लेख करताना त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. त्यानंतर मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांच्यावर पलटवार करत त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हंटल आहे.
देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत.म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहे असे मत व्यक्त केले. मलिकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे ही मुन्ना यादव यांनी जाहीर केले.
नवाब मलिक यांची औकात १ रुपयाची आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा देखील एक रुपयाचाच ठोकणार. त्यांनाही माझं आवाहन आहे की माझी चौकशी करावी. माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईन. पण मी कोर्टात जाणार आणि तिथं नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध करणार”, असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत मुन्ना यादव-
ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे नागपुरात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात
2014 मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळावर अध्यक्ष म्हणून करण्यात आली. तेव्हापासून मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी यादव ह्या मुन्ना यादव यांच्या प्रभाग क्रमांक 16 मधून नगरसेविका आहेत