शिरवळ बसस्थानकातील खूनाचा 12 तासात उलगडा, जिल्ह्यातून पलायन करताना एकजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा |  शिरवळ बस स्थानकाच्या शौचालयात घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अवघ्या 12 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी दि. 20 रोजी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत शिरवळ एस.टी. स्टॅन्डच्या सार्वजनीक शौचालय चालकाचा खून झाला होता. या खूनातील आरोपी जिल्ह्यातून पलायन करण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आले आहे. संशयिताचे विनोद भिमराव वावळे (वय- 28, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे नांव आहे. दारूच्या नशेत किरकोळ वादाच्या कारणावरून रागात खून केल्याची कबूली दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकासह शिरवळ परिसरत रवाना झाले असता, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शिरवळ येथील खून करणारा इसम शिरवळ एस.टी. स्टॅन्डचे पाठिमागे फिरत असून तो सातारा जिल्ह्यातून पलायन करण्याच्या बेतात आहे. तेव्हा माहिती मिळताच पोलिसांनी शिरवळ एस.टी. स्टॅन्ड परिसरात सापळा रचलेला होता. थोड्याच वेळात बातमीदाराकडील वर्णनाप्रमाणे असलेला संशयित इसम शिरवळ एस.टी. स्टॅन्डचे दिशेने येताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ सदर संशयित इसमास ताब्यात घेणेसाठी हालचाल केली असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे खुनाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याने पोलीस पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीस पथकाने त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता संशयीत इसमाने दारुच्या नशेत किरकोळ वादाच्या कारणावरून राग आल्याने त्याचा खून केला असले बाबत कबूली दिली. सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाने व शिरवळ पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या तपास करून 12 तासाचे आत उघड केला असून आरोपीस पुढील कारवाई करीता शिरवळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

सदर कारवाईमध्ये सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे खराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,  महेश इंगळे यांनी , सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सफौ उत्तम दबडे, तानाजी माने, पोहवा संतोष सपकाळ, मोहन नाचण, पीना राजकुमार ननावरे, अजित कणे, निलेश काटकर, नितिन गोगावले पोशि वैभव सावंत, पोशि चालक विजय सावंत स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व सफाै हजारे, वळवी, पोहवा आप्पा कोलवडकर, पोना जितू शिंदे, धिरज यादव, वैभव सूर्यवंशी, पोशि सचिन शेलार, संतोष ननावरे, भाऊसाहेब दिघे, नितीन महागरे, सचिन वीर, प्रशांत वाघमारे, विनोद पवार शिरवळ पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला असून अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment