साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा शहराजवळील महामार्गावर असलेल्या नटराज मदिरा बाहेर भर दिवसा एकाच्या डोक्यात गोळी घालून खून केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक नजीक असलेले नटराज मंदिर परिसरामध्ये फायरिंग झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबारात अर्जून यादव (रा. वाई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे‌.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नटराज मंदिर पुणे बेंगलोर महामार्गावर आहे. तेथे आज शनिवारी दि. 2 रोजी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, एक अज्ञात व्यक्ती जमिनीवर पडलेला दिसला. मंदिरा बाहेर फायरिंग झाल्याने मोठी खळबळ उडाली.

एका अज्ञात व्यक्तीने मंदिरा बाहेर एकाच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडून खून केला. साताऱ्यात आज दुपारी भर पावसामध्ये ही घटना घडली. त्यामुळे सातारा शहरात एक खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सातारा शहर पोलीस यांनी धाव घेत तेथील गर्दी कमी करण्यात यश मिळवले आणि मृत व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख अजून पटली आहे, तर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेला आहे. सातारा पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.