परळी : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील परळी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीची छेड काढल्याबाबत जाब विचारायला गेलेल्या आईची चाकू भोसकून हत्या (murder) करण्यात आली आहे. अनिता राठोड असे हत्या (murder) करण्यात आलेल्या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात हत्येचा (murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. बबन चव्हाण आणि राजाभाऊ चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बबन चव्हाण याने अनिता राठोड यांच्या मुलीची छेड काढली होती. याचाच जाब विचारण्यासाठी अनिता बबनकडे गेल्या होत्या. यावेळी त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्या रागातून बबन चव्हाण आणि राजाभाऊ चव्हाण यांनी अनिता राठोड यांची हत्या (murder) केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी अनिता राठोड आणि त्यांचे पती तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना तांडा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवले होते. यावेळी बबन चव्हाण याने यातील एका मुलीची छेड काढली आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अनिता जेव्हा तिरुपतीहून परत आल्या तेव्हा मुलीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतापलेल्या अनिता राठोड बबनला छेडछाडीबद्दल जाब विचारण्यासाठी गेल्या. यावेळी अनिता आणि बबन यांच्यात जोरदार भांडण झाले.
जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
हा वाद एवढा विकोपाला गेला कि त्यानंतर बबनने महिलेच्या पोटावर धारदार चाकूने वार (murder) केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अनिताचा मृत्यू (murder) झाला. यामुळे संतापलेल्या अनिताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. तसेच आरोपीच्या अटकेसाठी रुग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???