जत येथे जनावरे खरेदी- विक्री करणाऱ्यांचा अर्थिक व्यवहारातून खून, संशियत तरूणांस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील पशुपैदास केंद्राच्या हद्दीत आर्थिक देवाण-घेवाणच्या कारणावरून एकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली. बंदेनमाज उर्फ बंडा मकदूम शेख (वय- 40, रा.सातारा रोड, मदारी गल्ली जत) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मुन्ना मकदुम शेख यांनी पोलिसांत दिली आहे. सदरची घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जत येथील संशयित आरोपी संतोष हारणे (वय-21) याला हिवरे येथून रात्री उशिरा अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बंदेनमाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या काही महिन्यापूर्वी जत शहरातील संतोष हारणे याला 40 हजार किमतीची म्हैशीची विक्री केली होती. या म्हशीला गंभीर आजार असल्याने ती परत शेख यांस परत दिली होती. यामध्ये हारणे यांनी व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मयत शेख यांनी हारणे यास 30 हजार रुपये देऊन वादाचा विषय मिटविण्यात आला होता.

परंतु सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बंदेनमाज उर्फ बंडा शेख यांस कॅटल फार्म येथे हारणे यांनी बोलवून नेले होते. याठिकाणी हारणे याने धारदार शस्त्राने बंदेनमाज उर्फ बंडा शेख याचा खून केला. ही घटना समजताच जतचे पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले व जत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर संशयितांला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. संशयित हिवरे परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याठिकाणाहून संशयित तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करत आहेत.

Leave a Comment