iPhone ऑर्डर केला खरं पण पैसे नसल्याने Delivery Agent चीच हत्या; कुठे घडला प्रकार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल तरुणाईमध्ये मोबाईलचे मोठं वेड आहे. अगदी शाळकरी वयातच मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यातच iPhone वापरणे प्रत्येकाचे स्वप्न असत. परंतु किंमत महाग असल्याने अनेकांना इच्छा असूनही त्याची खरेदी करता येत नाही. एखाद्या गोष्टीची इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु ती मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडणे बरोबर नाही. अशीच एक घटना कर्नाटक मध्ये घडली आहे. येथील एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने आयफोन ऑर्डर केला खरा परंतु पैसे नसल्याने त्याने चक्क डिलिव्हरी एजंटचीच हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हेमंत दत्त असं 20 वर्षीय सदर आरोपीचे नाव असून त्याने ऑनलाइन सेकंड हँड आयफोन ऑर्डर केला होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी ई-कार्ट एक्सप्रेस कंपनीत काम करणारा डिलिव्हरी बॉय हेमंत नाईक फोनची डिलिव्हरी करण्यासाठी दत्ता यांच्या घरी पोहोचला. मात्र तेव्हा हेमंत दत्त याने त्याला पैसे देण्यास असमर्थता दाखवली. आणि धारदार चाकूने वार करून डिलिव्हरी बॉयचीच हत्या केली. 7 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.

डिलिव्हरी बॉयच्या हत्येनंतर हेमंत दत्त याने तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला आणि संधी मिळताच गोणीत मृतदेह भरून रेल्वे ट्रॅकजवळ जाळला. मात्र तो मृतदेह घेऊन स्कूटीरून जात असताना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी हेमंत दत्ताला पकडले असता त्याने संपूर्ण घटनेची कबुली दिली.