पती- पत्नीच्या वादातून स्वतःच्या दोन चिमुकल्याचा खून : बापाला जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
आपल्या पश्चात पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही. असे वाटल्याने बापाने आपल्या दोन चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात सातारा न्यायालयाने आरोप बापास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पती- पत्नीच्या घरगुती वादातून मुलगी गौरवी (वय- 11), मुलगा प्रतीक (वय- 7) याचा चिमुकल्यांचा बळी घेण्यात आला. तर चंद्रकांत अशोक मोहिते (वय- 40, रा. घाटकोपर, मुंबई, मूळ. रा. रासाटी, ता. पाटण) असे आरोपी बापाचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी ही शिक्षा दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, आपल्या मागे पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही, असे वाटल्याने बापाने आपली मुगली गाैरवी हिचे डोके रस्त्यावर आपटून तर मुलगा प्रतीक यांचा गळा आवळून खून केला. दि. 9 ऑक्टोबर 2019 साली महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. चंद्रकांत मोहिते हा दोन्ही मुलांना कारमध्ये घेवून घाटकोपर, मुंबई येथून निरा नदीवरील रस्ता ओलांडून खंडाळा हद्दीतील कॅप्सूल कंपनी परिसरात आला. यावेळी दोन्ही मुलांचा खून केला. यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारच्या डीकीत ठेवून कारमधून निघाला होता. त्यावेळी मोहिते खंडाळा पोलिसांना सापडला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोनि उमेश हजारे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर, फेरोज शेख, गौरी लकडे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला. या खटल्यात साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यावरुन आरोपी अशोक मोहिते याला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.