बहिणीच्या दिरासोबत जुळलेल्या प्रेमसंबंधामुळे आईच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव आढळल्याने पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि एक मोठे हत्येचे प्रकरण पुढे आले. यामध्ये पत्नीने आपल्या प्रियकर आणि आईच्या मदतीने कोळसा खाणीत काम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव मारूती काकडे असे असून तो सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी प्राजक्ताशी त्याचे कौटुंबिक वाद व्हायचे. यादरम्यान प्राजक्ताचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकलेसोबत अनैतिक संबंध होते. यानंतर या दोघांनी मारूतीचा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचला. मारूतीचा मृत्यू झाला तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल व प्रियकरासह विवाह करून आपले आयुष्य सुखी होईल असा तिचा प्लॅन होता.

यानंतर या दोघांनी शांत डोक्याने मारूतीला संपवण्याचा प्लॅन केला. बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे कट तडीस नेला. यासाठी आणखी एक साथीदार विकास नागरले याची मदत घेण्यात आली. विकास हा ठरल्यानुसार, मारुतीच्या घरी पोहोचला. किरायाने घर मिळेल का? याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून त्याला दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर दोघे जण नकोडा इथं पोहोचले. त्यानंतर तिथेच मारुतीचा गळा आवळून खून करण्यात आला. तो जिवंत राहू नये यासाठी नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर मृतदेह एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकण्यात आला.

या हत्येमागे पोलिसांना मृतदेह तातडीने मिळावा व त्यानंतर मृत मारुतीच्या जागी आपल्या नोकरीची प्रक्रिया सोपी व्हावी असा उद्देश होता. मात्र, पोलिसांनी मृताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केल्यावर पोलिसांना त्यांच्यावर अधिक संशय आला. यानंतर पोलिसांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर हि सगळी घटना उघडकीस आली. या गुन्ह्यात पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्रे, प्रियकर संजय टिकले व कटात सहभागी साथीदार विकास नागरले यांचा समावेश आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Leave a Comment