हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी तब्बल 1500 कोटींचा घोटाळा केला असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व ग्रामपंचायतीसाठी एक नियम केला. त्यांनी सगळ्या ग्रामपंचायतींसाठी एक ऑर्डर काढली. तुमच्या टॅक्सचं रिटर्न मी सांगेल ती कंपनी भरणार. तुमचं जीएसीटी, टीडीएस रिटर्न मी सांगेल तीच कंपनी आणि मी सांगणार तेवढी फी द्यायची अशी ऑर्डर काढली.
ग्रामविकास मंत्रालयाने जीआर काढला. आणि त्या एका कंपनीला 1500 कोटी रुपये मिळणार. छोटी ग्रामपंचायत असेल तर 3750 रुपये मिळणार. ग्रामपंचायतीच्या खिशात जाणारे पैसे मागच्या दरवाजातून मुश्रीफ यांच्या खिशात गेले, असा अरोप सोमय्या यांनी केले.
ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करायचे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. त्याची दखल त्यांना घ्यावी लागणार. कारण ती कंपनी अस्तित्वात नाही. अज्ञात कंपनीच्या नावाने बॅंक अकाऊंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतला आहे असा आरोप त्यांनी केला.