मुंबई । म्युझिक इंडस्ट्रीतील कंपनी टिप्स इंडस्ट्रीने गुरुवारी सांगितले की,”त्यांनी गूगलची नवीन यूट्यूब सर्व्हिस ‘शॉर्ट्स’ बरोबर म्युझिक लायसन्सिंग देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यूट्यूब शॉर्ट्स ही Google ची नवीनतम छोट्या व्हिडिओ देणारी सर्व्हिस आहे, ज्याद्वारे युझर्स आणि कलाकार छोट्या-कालावधीचे व्हिडिओ कंटेंट तयार करू शकतील.
टिप्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “या करारा अंतर्गत टिप्स त्याच्या मोठ्या संगीत स्टोअरचा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर लायसन्स देतील. याद्वारे, जगभरातील मोठा भारतीय समुदाय त्यांच्या लोकप्रिय आणि सुपरहिट संगीताद्वारे प्रेरित कंटेंट तयार करू शकतील. ”
तज्ज्ञांच्या मते, भारतातील टिक टॉकवरील बंदीनंतर शॉर्ट व्हिडिओंची जागा अद्याप रिक्त आहे. यूट्यूबला ही जागा शक्य तितक्या लवकर कव्हर करायचे आहे. शॉर्ट्स व्हिडिओंसाठी कित्येक प्लॅटफॉर्म लॉन्च केले गेले होते, परंतु टिक टॉक सारखी लोकप्रियता कोणालाही मिळालेली नाही. गुगलची नजर या मार्केटवर आहे.
युट्यूब शॉर्ट्स सप्टेंबर 2020 मध्ये लाँच झाला होता
बाजारात इतर सर्व शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर स्पर्धा करण्यासाठी YouTube ने सप्टेंबर 2020 मध्ये शॉर्ट्स सर्व्हिस सुरू केली. हा 15 सेकंदाचा व्हिडिओ बनविणे आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म सर्वप्रथम भारतीय युझर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाईल आणि त्यानंतर ते इतर देशांमध्ये देखील सुरू केले जाईल.
कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की,”ते हे जाहीर करण्यास उत्सुक आहेत की, ते यूट्यूब शॉर्ट्स बनवित आहेत जे यूट्यूबवर एक नवीन शॉर्ट फॉर्म व्हिडिओ एक्सपीरियंस आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर शॉर्ट व्हिडिओ शूट करण्याची परवानगी मिळू शकते.
देशात आगामी काळात यूट्यूब शॉर्ट्स बीटा फॉर्ममध्ये देखील उपलब्ध होतील. काही काळ प्रोडक्ट्सची टेस्टिंग केल्यानंतर, YouTube शॉर्ट व्हिडिओ फॉर्मेटचे स्टेबल व्हर्जन रिलीज करेल. या बीटा व्हर्जन मध्ये काही फीचर्स समाविष्ट असतील. उर्वरित फीचर्स पब्लिक किंवा स्टेबल व्हर्जनमध्ये जोडले जातील.
आगामी काळात ‘हे’ फीचर्स जोडले जातील
येत्या काही महिन्यांत आणखी काही फीचर्स जोडून ते अन्य देशांमध्ये विस्तारित करेल असा युट्यूबचा दावा आहे. यूट्यूब शॉर्ट्स टिकटॉक सारख्या फीचर्समध्ये विकसित झाल्याचे दिसत आहे. यात संगीत, स्पीड कंट्रोल, टायमर इत्यादीसारख्या फीचर्सचा समावेश आहे. यात एक मल्टी सेगमेंट कॅमेरा देखील आहे जो एकापेक्षा जास्त व्हिडिओ एकत्र करतो.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा