हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्त्वाला हात घातला होता. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
मनसेचे पुण्यातील पदाधिकारी माजीद शेख यांनी याबाबत म्हंटल की, आम्हाला जमिनीवर काम करावं लागत अशल्यामुळे लोकांना उत्तरं द्यावी लागतात. साहेब ब्ल्यू प्रिंट आणणार म्हणून मी मनसेत प्रवेश केला होता. मी माझा राजीनामा पाठवला असून, तो अद्याप स्वीकारला गेला नाही. अजून काही मुस्लिम पदाधिकारीही राजीनामा देणार आहे. मात्र, मी त्यांची नावं सांगणार नसल्याचं माजिद शेख यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांचा आदेश काय??
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ठाकरे सरकारला थेट आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा असे राज ठाकरे यांनी म्हंटल.