यमुनानगर । हिंदू मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाहासाठी धर्मांतर केले तर त्यास भाजप नेते ‘लव्ह जिहाद’ असे संबोधतात. ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना यमुनानगरमध्ये एक कमालीची घटना घडली आहे. हिंदू मुलीसोबत (Hindu Girl) विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलणाऱ्या एका मुस्लिम युवक (Muslim Youth Converts) आणि त्याच्या पत्नीला पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संरक्षण दिले आहे.
यमुनानगर पोलिस अधीक्षक कमलदीप यांनी मंगळवारी माहिती देताना सांगितले की, २१ वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीने ९ नोव्हेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या तरुणाने विवाहानंतर आपले नाव देखील बदलले होते. दांपत्याने त्यानंतर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आपल्याला मुलीच्या कुटुंबीयांपासून जीवाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला धोका असल्याचे तरुणाने न्यायालयात सांगितले. आपल्या विवाहाला विरोध करणे म्हणजेच भारतीय राज्यघटनेत्या कलम २१ अंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचेही या दांपत्याने कोर्टाला सांगितले.
पोलिसांकडून कुटुंबीयांचा मन वळवण्याचा प्रयत्न
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत दोघांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांनी त्यांना यमुनानगरच्या सुरक्षागृहात पाठवले. गेल्या काही दिवसांपासून हे विवाहित तरुण-तरुणी या सुरक्षागहातच राहात आहेत. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला. हे दोघे आता कायद्याने विवाहीत असून दोघांच्या इच्छेनुसार त्यांना आता सोबत राहता आले पाहिजे, असे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्याचे पोलिस अधीक्षकांनी माहिती देताना सांगितले.
बॉलिवूड मुंबईतच राहिल!, पण आम्ही…'; योगी आदित्यनाथांचे मोठं विधान
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/BGMP6z2qya@myogiadityanath #Bollywood #Yogiji #YogiInMumbai #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
मुलगा-मुलगी जन्मासंबंधीच्या वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कोरोनावर मोठं विधान, म्हणाले…
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/QARDgrhD82#indurikarmaharaj @MIndurikar #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराटनं मोडला सचिनचा 'हा' विक्रम; ठरला पहिला फलंदाज
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/ikwbKwLSny@imVkohli @sachin_rt @BCCI #ViratKohli #SachinTendulkar #INDvsAUS— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’