Mutual Fund | आजकाल असे बरेच लोक आहे. जे शेअर बाजारात गुंतवणूक करतात. वर्षभरात भारतीय शेअर बाजारात आता सध्या तेजी आलेले दिसत आहे. आणि त्याचाच परिणाम म्युच्युअल फंडवर देखील झालेला दिसून येत आहे .त्यामुळे आता अनेक म्युच्युअल फंड्सने गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत.
म्हणजेच त्यांना जबरदस्त परतावा मिळणार आहे. या क्षेत्रातील फंडने तर एका वर्षात तब्बल 97% चा परतावा दिलेला आहे. गेल्या एका वर्षात सेक्टोरल, स्मॉल कॅप आणि मिड कॅप यासारख्या फंडने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी एका वर्षात जवळपास 50 ते 94% पर्यंत दिलेला आहे.
पीएसयु फंड्सने दिला चांगला रिटर्न
गेल्या एका वर्षात पीएसयु म्युच्युअल फंड्सने सगळ्यात जास्त परतावा दिलेला आहे. या श्रेणीतील म्युच्युअल फंड्सने ९४.१० टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. या काळात आदित्य बिर्ला सन लाईफ तब्बल 96 टक्के तर एसबीआय गुंतवणूकदारांना 92% दिलेला आहे. मोदी सरकारने सार्वजनिक उपकरणातील कंपन्यांवर देखील आता अधिक लक्ष दिलेले आहे. आणि त्यांच्या विकासावर देखील जोडलेला आहे. त्यामुळे आता या कंपन्यांकडे परदेशातून देखील ऑर्डर येत आहेत.
इन्फ्राफंडस् देखील उतरले स्पर्धेत | Mutual Fund
इन्फ्राफंड्स यांनी देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी जोमात काम केलेले आहेत. त्यामुळे या श्रेणी त्यांना 98 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. या एका वर्षात एचचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडने 79.37% सर्वांपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. तर Nippon इंडिया पावर अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंडने या काळात 73.66 टक्क्यांचा रिटर्न्स दिलेला आहे.
फार्मा फंड्स
औषधशास्त्र क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे. मागील वर्षात या श्रेणी सरासरी 55.99% चा परतावा दिलेला आहे. आयसीआयसीआय प्रीडेन्शिअल फार्मा हेल्थकेअर अँड डायग्नोस्टिक फंड 62.73 दिलेला आहे त्यामुळे हा सर्वाधिक कमाई करणारा फंड या ठिकाणी ठरलेला आहे.
स्मॉल आणि मिडकॅप फंड
या फंडने देखील गेल्या एक वर्षात खूप चांगला परतावा दिलेला आहे. या कॅटेगिरीमध्ये सरासरीत 53.56% चा रिटर्न्स दिलेला आहे. तर मिडकॅप कॅटेगिरी सरासरी 50.37% चा परतावा दिलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा मिळाला आहे.