हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळाला. 21 जागांसाठी लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 20 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, जिल्हा बँकेत झालेला विजयाने नक्कीच आनंद झाला आहे.मात्र एक जागा गेली याच दुःख वाटतंय असे म्हणत जिथे कमी पडलो त्याची चौकशी करू असे अजित पवारांनी म्हंटल
सुरेश घुले यांच्या पराभवाने धक्का –
विद्यमान संचालक सुरेश घुले यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी घुले यांचा पराभव केला आहे. घुले यांच्या विजयासाठी स्वत: अजित पवार मैदानात उतरले होते. कंद यांना जागा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. तरीही घुले यांचा पराभव झाल्याने अजित पवारांची धक्का मानला जात आहे
14 जागा आधीच बिनविरोध
पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे हे 14 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत