कार्यकर्त्यांसाठी माझे दरवाजे कायम उघडे – अशोक चव्हाण

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या नांदेड मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरातील कुसुम सभागृहात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी हा संवाद कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साहेब तुमची भेट होऊ दिल्या जात नाही अशी तक्रार केली. यांवर कार्यकर्त्यांकरिता माझे दरवाजे कायम उघडे असल्याचे चव्हाण म्हणाले.

ठरवलेल्या वेळेपेक्षा तीन तास उशिराने हा कार्यक्रम सुरू झाला होता. मात्र स्वतः अशोक चव्हाण यांनी थेट कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. तसेच कार्यक्रमात वाढत्या बेरोजगारीकडे युवकांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले सोबतच विधानसभा निवडणूक आणि इतर अनेक गोष्टींवर चव्हाण यांच्यासोबत संवाद झाला. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.