नगरपालिका- नगरपंचायतीचा निवडणूकीचा बिगुल वाजणार, राज्यात 150 तर सातारा जिल्ह्यात 14 ठिकाणी निवडणूक

0
152
Satara Corporation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | राज्यातील सुमारे 150 नगर परिषद, नगर पंचायती व नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या नगर परिषदा व नगर पंचायतींचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली असून प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल. प्रभाग रचनेसाठी 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. प्रभाग रचनाची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत.

नगर परिषद व नगर पंचायतीच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनेनुसार हद्दीत झालेले बदल व भौगोलिक बदल विचारात घेण्यात यावेत. नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायत यांनी अधिसूचनेनुसार त्यांचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावे. प्रभाग रचना आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत संपण्यापूर्वी पूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी कच्चा आराखडा तयार करण्यात यावा.

सातारा जिल्ह्यातील 8 पालिका तर 6 नगरपंचायतीची रिंगणात

जिल्ह्यातील अ वर्ग सातारा पालिका, ब वर्ग फलटण व कराड पालिका, क वर्ग वाई, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी आणि म्हसवड या नगरपालिका तसेच कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, पाटण आणि लोणंद या नगरपंचायतींची निवडणूक लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here