नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल ‘परम का ढाबा’ या हॉटेलच्या संचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सोनी भुपेंद्र राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या संचालकाचे नाव आहे. त्यांनी कामठी रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नागपुरातील फूड लव्हर्समध्ये ‘परम की दाल’ प्रसिद्ध आहे. सोनी राजपूत हे 36 वर्षांचे होते. त्यांनी ऐन तारुण्यात एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?
नागपूर शहरातील ‘परम का ढाबा’ या प्रसिद्ध ढाब्याचे संचालक सोनी भुपेंद्र राजपूत यांनी कामठी रोड येथील आपल्या राहत्या घरी मंगळवारी सकाळी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते 36 वर्षांचे होते. घटनेच्या दिवशी मुलगा आणि पत्नी पंजाबला गेले असल्याने सोनी घरी एकटेच होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नातेवाईकांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र सोनी भुपेंद्र राजपूत यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांनी कौटुंबिक तणावातून हि हत्या केल्याचे समजत आहे.

यूट्यूबर्समध्ये सुप्रसिद्ध
नागपुरातील लकडगंज भागात असलेल्या सोनी भुपेंद्र राजपूत यांच्या हॉटेलमधील ‘परम की दाल’ फूड लव्हर्समध्ये प्रसिद्ध आहे. यूट्यूबवरही त्यांचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. त्यांनी अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment