धक्कादायक ! घटस्फोटित महिलेवर पोलिसानेच केला अत्याचार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने गुंगीचे औषध देऊन एका घटस्फोटित महिलेवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव आशिष प्रकाश काळसर्पे असे आहे. तो जलद कृती पथकात तैनात असून जिम प्रशिक्षकही आहे.

काय आहे प्रकरण
ही महिला आधी गोव्याला राहायची. ती आपल्या पतीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटची कामे करायची. या महिलेला १४ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. २००९मध्ये या महिलेचा घटस्फोट झाला होता. यानंतर ती नागपुरात आली. या महिलेची ऑक्टोबर २०२०मध्ये फेसबुकद्वारे आशिषसोबत ओळख झाली होती. नोव्हेंबरमध्ये आशिषने या महिलेला जिमबाबत माहिती देण्यासाठी तिला घरी बोलाविले.

तेव्हा या आरोपीने तिला कॉफी प्यायला दिली. कॉफी पिताच महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर महिलेने याचा जाब विचारला असता आशिषने या महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर त्याने घरातच तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर त्याने तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली. या आरोपीने लग्नाच्या बहाण्याने महिलेकडून लाखो रुपयेही उकळले. यानंतर काही दिवसं[पूर्वी त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर या महिलेने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.