नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नो पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद (police slaps security guard) झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी वाहतूक पोलीस उचलत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक पोलिसाच्या अंगावर धावून (police slaps security guard) गेला. यातून झालेल्या वादातून पोलिसाने सुरक्षा रक्षकाच्या कानशिलातच (police slaps security guard) लगावली. यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. परस्परविरोधी आरोप यावेळी करण्यात आले.सुरक्षा रक्षक आणि वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्या वादामुळे रस्त्यावर तणाव निर्माण झाला होता.
…आणि पोलिसानं सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली! नेमके काय घडले ? pic.twitter.com/cmN336KBxg
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 26, 2022
कुठे घडली घटना ?
नागपूरच्या सक्करदरा भागात तिरंगा चौकात एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाहेर काही गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. दुचाकी नो पार्किंगमध्ये उभ्या असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई (police slaps security guard) करण्याचे ठरवले. यानंतर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅन घेऊन हॉटेलसमोर दाखल झाले. कारवाईला सुरुवात झाली. यावेळी हॉटेलचा सुरक्षा रक्षक आणि वाहतूक पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
यानंतर संतापाच्या भरात वाहतूक पोलिसाने सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली (police slaps security guard) वाजवली. सुरक्षा रक्षण आणि पोलीस यांच्यातील वाद पाहून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. यानंतर लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. आता या संपूर्ण घटनेप्रकरणी नागपूर पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर