नागपूर -पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार; गडकरींनी सांगितला प्लॅन

nagpur pune highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे ते नागपूर हा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. यापूर्वी या पुणे -नागपूर प्रवासाला तब्बल 14 तास लागत होते, मात्र आता अवघ्या 8 तासांत अतिजलद वेगाने हा प्रवास होणार आहे. प्रवासांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली आहे. यासाठीचा संपूर्ण प्लॅन गडकरींनी सांगितला आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग नव्याने प्रस्तावित पुणे-औरंगाबाद ऍक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस वेला जोडला जाईल ज्यामुळे नागपूर ते पुणे हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यात मदत होईल. प्रवाशांची होणार गैरसोय आणि वेळ वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुणे- नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. सध्या, नागपूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी सुमारे 14 तास लागतात मात्र नवीन प्रोजेक्ट नंतर आपला ६ तासांचा वेळ वाचणार आहे.