Monday, January 30, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक सातारा दाैऱ्यावर : प्रशासनाची पळापळ

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर आज येत आहेत. आज सकाळी 11 वाजता दरे गावात मुख्यमंत्र्याचे आगमन होणार आहे. मुख्यमंत्री अचानक महाबळेश्वर दाैऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावात आज येणार आहेत. खासगी कारणाने मुख्यमंत्री गावी येणार आहेत. मुंबईहून हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे येणार आहेत. परंतु हा दाैरा खासगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त भिलार येथे येणार होते. परंतु अचानक त्यांनी तो दाैरा रद्द केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री आपल्या गावी येत आहेत.