नागपुरात स्कूल बसच्या अपघातात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरातील खसाळा येथे हि दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा अपघातात (accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघतात 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सम्यक कळंबे असे या मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

काय घडले नेमके?
खसाळा येथील मेरी पाऊसपिन्स या शाळेसमोर विद्यार्थ्यांना बसने एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. त्यानंतर तीन विद्यार्थी बसच्या खाली आले. त्यांतील दोन मुले चाकांच्या गॅपमधून बाहेर पडले. पण एक मुलगा बससोबत घासत दूर गेल्याचे व्हिडिओमध्ये आहे. या अपघातात (accident) तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सर्वप्रथम स्कुल बसने स्कुटीला धडक दिली. त्या स्कुटीवरील महिला खाली पडली. तिला उचलायला एक विद्यार्थी सरसावला. पण तेवढ्यात स्कुल बसने खासगी व्हॅनला धडक दिली. यामध्ये तीन मुले व्हॅनच्या खाली सापडली. दरम्यान त्यांच्यामध्ये एक रिक्षा फसली होती. यातील निसटलेल्या एका मुलाने प्रसंगावधान बाळगत रिक्षाकडे धावत गेला परंतु तो किरकोळ जखमी (accident) झाला. यादरम्यान सम्यक कळंबे हा विद्यार्थी या बसखाली घावला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..