महाराष्ट्र- आंध्र प्रदेशला जोडणार ‘हा’ महामार्ग; 14,666 कोटींचा खर्च, कधी पूर्ण होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील रस्ते विकासासाठी केंद्र शासनाने भारतमाला योजना लागू केली आहे. ज्या अंतर्गत देशभरात अनेक एक्सप्रेस वे बनवले जात आहेत. ज्याद्वारे प्रवासी तसेच मालवाहू वाहतूक जलद गतीने होऊ शकेल. भारतमाला phase -1 आणि phase- 2 योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तसेच देशातील अनेक प्रमुख शहरे तसेच बंदरे एकमेकाना जोडण्याचे काम सुरु आहे. याचाच भाग म्हणजे भारतमाला phase -1 योजने अंतर्गत असलेला नागपूर ते विजयवाडा दरम्यान एक्सप्रेस वे (Nagpur-  Vijayawada Expressway) तयार करण्यात येत आहे.

नागपूर ते विजयवाडा एक्सप्रेसवे महाराष्ट्र,तेलंगणा, आणि आंध्रप्रदेश या राज्यामधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात महत्वाचा ठरेल . महाराष्ट्रात नागपूर येथून हा एक्सप्रेसवे सुरु होऊन आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे संपेल . विजयवाडा हे आंध्रप्रदेशातील महत्वाचे बंदर (Port) शहर असून या बंदराच्या माध्यमातून माल देशाबाहेर निर्यात केला जातो. नागपूर ते विजयवाडा प्रवासासाठी सध्या 13 तासापेक्षा अधिकचा वेळ लागतो. परंतु आता नागपूर – विजयवाडा एक्सप्रेसवे चे काम पुर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्यावर म्हणजेच ५-६ तासांवर येईल.

किती आहे महामार्गाचे अंतर ?

सदर महामार्ग एकूण 405 किलोमीटर अंतराचा असेल जो की पूर्णपणे 4 लेन मध्ये बनवला जाईल. हा महामार्ग काही ठिकाणी पुर्णपणे नवीन बनवला जाईल. ( ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे ) तर काही भागात ब्राउनफील्ड असेल. नागपूर – विजयवाडा एक्सप्रेसवे राष्ट्रीय राजमार्ग विकास प्राधिकरण ( NHAI )च्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला Detailed project reported ( DPR ) अजून तरी NHAI च्या वेबसाईट वर उपलब्ध झालेला नाही.

14,666 कोटी खर्च अपेक्षित

नागपूर – विजयवाडा या एक्सप्रेसवेसाठी एकूण 14,666 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा महामार्ग 2027 पर्यंत पुर्ण होईल अशी आशा आहे. सध्यस्थितीत 7500 कोटी रुपयांचे मंचेरियल- वारंगल-खम्मम या ब्राउनफील्ड मार्गाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. भविष्यात नागपूर – विजयवाडा दरम्यान मालवाहतूकसाठी हा महामार्ग महत्वाचा ठरेल यात शंका नाही .