हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र्रात आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची प्रभाग रचना आणि त्यांच्या नावांची यादी आज जाहीर झाली आहे.
पुणे महानगर पालिकेच्या फुटलेल्या यादीमध्ये महापालिकेत एकून ५८ प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने आराखडा 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याबाबत सूचना केली होती. मात्र, आज दुपारी साडेचारच्या सुमारास महापालिका वेबसाईटवर वॉर्डची नावे जाहीर झाल्यामुळे निवडणूक विभागातच मोठा गोंधळ असल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही मिनिटातच ही यादी वेबसाईटवरून काढण्यात आली आहे.
पुणे महानगर पालिकेच्या नवीन प्रभागांची हि आहेत नावे
1. धानोरी – विश्रांतवाडी,
2. टिंगरेनगर – संजय पार्क,
3. लोहगाव – विमान नगर,
4. वाघोली – इऑन आयटी पार्क,
5. खराडी – चंदननगर,
6. वडगावशेरी,
7. कल्याणीनगर – नागपूर चाळ,
8. कळस – फुलेनगर,
9. येरवडा,
10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी,
11. बोपोडी – पुणे विद्यापीठ,
12. औंध – बालेवाडी,
13. बाणेर – सुस म्हाळुंगे,
14. पाषाण – बावधन बुद्रुक,
15. पंचवटी – गोखलेनगर,
16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे,
17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर,
18. शनिवार वाडा – कसबा पेठ,
19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल,
20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड,
21. मुंढवा – घोरपडी,
22. मांजरी – शेवाळवाडी,
23. साडेसतरानळी – आकाशवाणी
24. मगरपट्टा – साधना विद्यालय
25. हडपसर गावठाण – सातववाडी
26. भीमनगर – रामटेकडी
27. कासेवाडी – हरकानगर
28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट
29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई
30. जयभवानी नगर – केळेवाडी
31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर
32. भुसारी कॉलनी – सुतारदरा
33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी
34. वारजे – कोंढवे धावडे
35. रामनगर – उत्तमनगर शिवणे
36. कर्वेनगर
37. जनता वसाहत – दत्तवाडी
38. शिवदर्शन – पद्मावती
39. मार्केटयार्ड – महर्षी नगर
40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क
41. कोंढवा खुर्द – मिठानगर
42. सय्यदनगर – लुल्लानगर,
43. वानवडी – कौसरबाग,
44. काळेपडळ – ससाणेनगर,
45. फुरसुंगी,
46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची,
47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी,
48. अप्पर सुपर इंदिरानगर,
49. बालाजीनगर – के के मार्केट,
50. सहकारनगर – तळजाई,
51. वडगाव – पाचगाव पर्वती,
52. नांदेडसिटी – सनसिटी,
53. खडकवासला -नऱ्हे,
54. धायरी – आंबेगाव,
55. धनकवडी – आंबेगाव पठार,
56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ,
57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर,
58. कात्रज – गोकुळनगर