मुंबई प्रतिनिधी | अभिनेते आणि नाम फाऊंडेशन चे संस्थापक नाना पाटेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी १ करोड रुपये दान केले आहेत. नाम फाऊंडेशन मार्फेत आपण सीएम, पीएन फंडासाठी प्रत्तेकी ५० लाख रुपये देत आहोत अशी माहिती पाटेकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूसोबत सरकार एकटे लढू शकणार नाही. तेव्हा सरकारला आपण साथ द्यायला हवी. जात – पात, धर्म विसरुन आपण कोरोनाशी लढायला हवंय असं म्हणत नाना पाटेकर यांनी नागरिकांना आपआपला वाटा उचलण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे. pic.twitter.com/ZlWliTc4rO
— Nana Patekar (@nanagpatekar) March 30, 2020
दरम्यान, घराबाहेर न पडणे ही या क्षणाची सर्वात मोठी देशसेवा आहे तेव्हा कृपया घराबाहेर पडू नका असंही पाटेकर यावेळी म्हणालेत. एवढी मेहेरबाणी करा असं म्हणत पाटेकर यांनी नागरिकांना कळकळीने हात जोडून विनंती केली आहे.