प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार – नाना पटोले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढेल असे म्हंटल होत. त्यात आता प्रकाश आंबेडकर पण सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्द्यावर संकेत दिलेत. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी त्यांनी ‘सामना’तील अग्रलेखावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना उपरोधिक टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो, असा टोला त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment