नांदेडमध्ये कार-ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, 4 जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एक गरोदर महिला बालंबाल बचावली असून ती सध्या जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड – देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात कारमधील बिलोली येथील शंकर जाधव , महानंदा जाधव आणि कल्पना शिंदे असे तिघे जण जागीच ठार झाले. तर धनराज जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच स्वाती शिंदे ही गरोदर महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. 3 जून रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

कसा झाला अपघात?
नायगाव तालुक्यातील रातोळीमधील टाकळी येथील जाधव कुटुंब शंकरनगरकडे जायला निघाले होते. मात्र कुंचेली फाट्यावर या कुटुंबाच्या गाडीला एका भरधाव ट्रकने समोरुन धडक दिली. यामध्ये AP 03 TA 3186 नंबरच्या ट्रकने जाधव कुटुंबीयांच्या MH 25 T 1075 क्रमांकाच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये स्विफ्ट कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच तिघांचा मृत्यू झाला होता. तर कार चालक गंभीर जखमी अवस्थेत होता. यानंतर कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान कारचालक धनराज शंकर जाधव याचा मृत्यू झाला. या अपघातात स्वाती शिंदे ही महिला या अपघातात (Accident) जखमी झाली आहे. या भीषण अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

 

Leave a Comment