नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.

दरम्यान, राणेंच्या भाजप प्रवेशाला आधी विरोध करणारे जिल्हाध्यक्ष जठार हे आता मात्र राणेंचं भरभरून कौतुक करत आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवार रणजित देसाई यांच्या प्रचारार्थ भाजपाने स्वाभिमानी आणि भाजपचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी नारायण राणे भाजपात लवकर सामील होत असल्याचे सूचक वक्तव्य केले.

यावेळी मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले, ‘माझ्या पक्षात स्वाभिमानी मधील अनेक मंडळी आलीत, पण आता किरकोळ प्रवेश नाही तर राणे साहेबांमुळे मेगा भरती होणार आहे, आणि त्यामुळे आता भाजप हाऊसफुल्ल झाला आहे.’ जठार यांच्या या वक्तव्यानंतर आता नारायण राणे यांचा पक्ष भाजपात विलीन होणार हे स्पष्ट होताना दिसत आहे. मात्र, राणेंच्या भाजप प्रवेश महायुतीतील शिवसेनेला हा प्रवेश किती रुचतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

इतर काही बातम्या-