मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना बेडूक आणि बेडकाची पिल्ले, अशा अप्रत्यक्ष शब्दांत टोले लगावले होते. या टीकेला नारायण राणे यांनी सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रत्युत्तर दिले.
”कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल,” असा इशारा भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी दिला.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं; नारायण राणेंचा हल्लाबोल
वाचा सविस्तर – https://t.co/TCHY0ZJ7vD@CMOMaharashtra @NiteshNRane @meNeeleshNRane #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची शेलकी टीका
वाचा सविस्तर -👉 https://t.co/AmKzzxjCv4@BJP4Maharashtra @ShelarAshish @CMOMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकही जण फडणवीसांप्रमाणे सरकारी रुग्णालयात भरती का झाला नाही? भाजपचा सवाल
वाचा सविस्तर -👉 https://t.co/C6Zv9L2gMc@Dev_Fadnavis @CMOMaharashtra #HelloMaharashtra @ChDadaPatil #coronavirus— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in