हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचा नेत्यांनी केली होती. या दरम्यान चौकशी केन्यासाठी हज राहण्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नितेश राणे फरार झाले. यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला राणेंनी उत्तर दिले. मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही, असे उत्तर केंद्रीय मंत्री राणे यांनी कणकवली पोलिसांना पत्राद्वारे दिले आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही. कामामुळे आणखी दोन ते तीन दिवस व्यस्त राहणार आहे. व्हिसीद्वारे तुम्ही माझा जबाब घेऊ शकता, असे उत्तर मंत्री राणेंनी पोलिसांना दिले आहे.
दरम्यान, आज भाजप नेते नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे. राणेंच्या या जामीन अर्जावर आज निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.