हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि नारायण राणे यांच वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करताना नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला होता. काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितलं नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राणे यांचे नाव न घेता लगावला.
यावर नारायण राणे यांनी पलटवार करत मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी.” असं नारायण राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी. @CMOMaharashtra@OfficeofUThttps://t.co/SklDkFH0bz
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 6, 2021
राणेंनी बांधलं आहे वैद्यकीय महाविद्यालय –
भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह आले होते. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे नारायण राणे म्हणालेले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’