हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केलाआहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलंय. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.
शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?असे ट्विट नारायण राणे यांनी केल आहे.
शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, 'गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील', अशा
वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?— Narayan Rane (@MeNarayanRane) June 27, 2022
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिंदे गटाने आज अनेक याचिका दाखल केल्या आहेत. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेने गटनेते, प्रतोद नियुक्त्या अवैध पद्धतीने केल्याचा दावा शिंदे गटाने या याचिकेत केला आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरु असून न्यायालयाच्या निर्णयावर ठाकरे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे