कॉमेडियन भारती सिंगच्या घरी NCBची छापेमारी; झडाझडतीत सापडला गांजा

मुंबई । बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. तिच्या घराच्या झडाझडतीत घरात गांजा सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार पकडलेल्या अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छापा दरम्यान एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like