पुणे प्रतिनिधी | नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबत सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. पुणे येथील विशेष न्यायालयात सीबीआयने दाभोलकर हत्ये संदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात शरद कळसकर आणि सचिन अंदुरेने या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत असे म्हणण्यात आले आहे. दाभोलकर हत्येसंदर्भात सीबीआय या तपास यंत्रणेने केलेला हा सर्वात मोठा खुलासा आहे असे बोलले जाते आहे.
शरद कळसकर याने दाभोलकर यांना गोळ्या झाडल्याची कबुली देखील दिली आहे. त्यासाठी सीबीआयने त्याची फोरेन्सिक सायकॉलॉजिकल अॅनेलेलिस टेस्ट केली आहे. या टेस्ट मध्येच त्याने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. तर जून २०१८मध्ये शरद कळसकर संजीव पुनाळकर याला भेटला. त्यावेळी कळसकरने दाभोलकरांच्या हत्येचे पुरावे नष्ट करा असे संजीव पुनाळकर याला सांगितले. कळसकर याने सांगितल्यानंतर पुनाळकर याने दाभोलकर हत्येचे पुरावे नष्ट केले.