दिल्ली | आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी या पुस्तकावरुन चांगलाच वादंग उठला असताना आता सदर पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात शिवरांयांशी मोदींची शारिरीक तुलना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंन्द्र मोदी यांच्याशी तुलना कशी होऊ शकते असा सवाल करत अनेकांनी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपने सदर पुस्तक मागे घेतल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
शिवाजी महाराज आणि नरेंन्द्र मोदी यांच्यातील शारिरील समानतेवर भाष्य करणारे प्रकरण सदर पुस्तकात असल्याची चर्चा आहे. भाजपने पुस्तक मागे घेतल्याचे म्हटले आहे मात्र आता पुस्तकाती या प्रकरणामुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी पुस्तकाचे लेखक भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. भाजपने मात्र गोयल यांचा पक्षाशी काहिही संबंध नसल्याचे म्हटले आहे.