हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे. घाबरून जाऊ नका असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, ‘आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्यालाच अधिक प्राधान्य द्यायचे आहे. भारत सरकार संपूर्ण शक्तीनिशी राज्य सरकारांसोबत उभी आहे. राज्य सरकारेदेखील आपले कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.
मोदी म्हणाले, लशीसंदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरविण्यात आली आहे, तिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध होणार आहे
कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेलं होतं. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं मोदींनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.