व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी अजूनही लाॅकडाउनला लोकं गांभिर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटूंबाला वाचवा असे आवाहनही मोदींनी केले आहे. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी भारतीयांना कोरोनाला गांभिर्याने घेण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे गांभिर्याने पालन करा अशी सुचनाही पंतप्रधानांनी दिली आहे. राज्य सरकारांनी नियम आणि कायद्याचं पालन होईल याची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी देशभर जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. मात्र आज अनेक शहरांत नागरिक रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. यामुळे लोक कोरोनाला गांभिर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. आता पंतप्रधानांच्या या ट्विटनंतर राज्य सरकार कायदा आणि नियमांचे पालन व्हावे याकरता नियम तोडणार्यांवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास