अयोध्येवरुन परतताच पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 1 कोटी नागरिकांसाठी सुरू करणार ही योजना

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी (22 जानेवारी) मोठ्या थाटामाटात अयोध्येत राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) लोकार्पण सोहळा पार पडला आहे. खास बाब म्हणजे या सोहळ्याला अवघे काही तास उलटून गेल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी नरेंद्र मोदींकडून सूर्योदय योजनेची (Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर हक्काचे सोलर सिस्टीम असावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेबाबतची माहिती स्वतः नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच X अकाउंट वरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांची स्वत:ची सोलर यंत्रणा असावी. अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीयांचे वीज बिल तर कमी होईल आणि भारत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होईल”

दरम्यान, 22 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळाला प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपनेची पुजा केली. तसेच, श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला. यानंतर त्यांनी सर्व भक्तांची संवाद साधला. यावेळी बोलताना, “राम म्हणजे आग नाही तर ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, तर तोडगा आहे असेही त्यांनी म्हटले. राम वर्तमान नसून शाश्वत, अनंत आहे. राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा आधार आहे, राम हा भारताचा विचार आहे, राम हा भारताचा विचार आहे” असे नरेंद्र मोदींनी म्हणले.