कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
‘माझी स्टाईल-बिईल नाही. कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नसून परमनंट राहून लोकांचे काम करायचे आहे’ असे म्हणत शिवसेना-भाजप महायुतीचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे, सांगली आणि कोल्हापूरचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी मात्र दयनीय बनल्या आहेत. याचे कारण म्हणजे उद्योजकांच्याकडे खंडण्या मागितल्या जात आहेत, आपण निवडूण आल्यास उद्योगधंदे भयमुक्त करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शेकडो कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. भविष्यातही ही कामे अशीच कायम राहणार आहेत. माथाडी कामगार संघटना आपल्याच पाठीशी असून आपल्यातील एक माणूस लोकसभेत जाऊन प्रलंबीत प्रश्न सोडवताना त्यांना पहायचा आहे’ असे म्हणुन पाटील यांनी आपणच सातारा लोकसभा जिंकणार असल्याचस विश्वास बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामापासून आपण खूपच प्रभावीत झालो असून त्यांनी नेहमीच माथाडींच्या प्रश्नांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…