Wednesday, June 7, 2023

सातारा : बायकोला डबल शीट बसवून नरेंद्र पाटलांचा निवडणूक प्रचार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे प्रचारार्थ सातारा शहरातून कार्यकर्त्यानी मोठे शक्तीप्रदर्शन करीत मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी पत्नी डाॅ प्राची पाटील यांना आपल्या बुलेटवर डबल सीट बसनलं होतं.

भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हि मोटर सायकल रॅली तालिम संघ, मोती चॊक, राधिका रोड,एस टी स्टॅन्ड,करंजे,गोडोली या मार्गाने काढण्यात आली.

सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे आणि नरेंन्द्र पाटील असा सामना रंगला असून त्यांच्यार चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जातंय.