हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्यानी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील याठिकाणी पिछाडीवर पहायला मिळत आहेत. सत्यजित तांबे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
तिसऱ्या फेरीपर्यंत सत्यजित तांबे जवळपास २० हजार अजून अधिक मतांनी आघाडीवर दिसत आहेत. तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे याना ४५ हजार ६६० मते मिळाली तर शुभांगी पाटील याना २४ हजार ९२७ मते पडली आहेत. सुरुवातीपासूनच सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gqOdx2G8v4#Hellomaharashtra @NANA_PATOLE @INCMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 2, 2023
दरम्यान, आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, नागपूर आणि औरंगाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला दणका दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात काँग्रेसच्या सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. तर औरंगाबादेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवत भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. कोकण मतदार संघात मात्र भाजपचा विजय मिळवता आला आहे. त्याठिकाणी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. तर अमरावती मध्ये भाजपचे रणजित पाटील आणि महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.