इगतपुरी : हॅलो महाराष्ट्र – नाशिक मुंबई हायवेवरील नवीन कसारा घाटात कंटेनरचा भीषण अपघात (accident) झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने एक कंटेनर घाटातील संरक्षक कठडा तोडून थेट 50 फूट खोल दरीत कोसळला आहे. हा कंटेनर दरीत कोसळल्यानंतर चालकही अपघातग्रस्त कंटेनरच्या खाली अडकला गेला. चालक कंटेनरच्या आतच अडकला होता. यामध्ये सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या कंटेनरचा चालक या अपघातातून (accident) थोडक्यात बचावला आहे. तब्बल एका तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर कंटेरनच्या आत अकडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
काय घडले नेमके?
नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंट पेव्हर ब्लॉकने भरलेल्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. या कंटेनरचा क्रमांक MH 49 HF 1513 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात (accident) घडला. या अपघातग्रस्त कंटेनरने आधी संरक्षक भिंतीला धडक दिली. संरक्षक भिंतीला तोडून कंटेनर थेट 50 फूट खोल दरीत जाऊन कोसळला. यावेळी कंटेनरचा चालक हा चक्क कंटेनरच्या खाली अडकला. त्याला बाहेर पडायला कोणताच मार्ग नव्हता.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणानी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस केंद्र, घोटी, आपत्ती व्यवस्थापन टीप आणि रुट पेट्रोलिंग टीमच्याा साहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनी चालकाला बाहेर काढण्यात यश आले. भीषण अपघातातून (accident) थोडक्यात बचावलेल्या चालकानेही कंटेनरच्या बाहेर आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. या अपघातातील चालक जखमी झाला असून त्याच्यावर इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!