Monday, January 30, 2023

राष्ट्रवादीमुळेच भाजपची सत्ता आली; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच फडणवीसांची सत्ता आली असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, मात्र तेव्हा राष्ट्रवादीने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढला. त्यावेळी राष्ट्रवादीने जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र तसं झालं नाही आणि याचा भाजपला फायदा झाला. त्यामुळे राज्यात फडणवीसांचे सरकार सत्तेत यायला कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

- Advertisement -

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाष्य केलं . भारत जोडो यात्रा’ म्हणजे ‘मोदी हटाव यात्रा’ आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधानपदावर आहेत तोपर्यंत देशात दूषित वातावरण राहणार आहे त्यामुळे बदलाची गरज आहे.काँग्रेसला आगामी निवडणुका जिंकाव्याच लागतील असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलं काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.