हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या प्रियकरायला भेटण्यासाठी राजस्थानहून पाकिस्तानला गेलेल्या भारतीय महिला अंजूचे (Anju) प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या अंजूने पाकिस्तानला जाऊन प्रियकर नसरुल्लाहशी (Nasrullah) निकाह केला आहे. तिच्या हा निकाहनामा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अंजूने एका पाकिस्तानी व्यक्तीशी निकाह केल्यामुळे अंजूची भारतात आल्यानंतर हत्या होऊ शकते असा दावा प्रियकर नसरुल्लाहने केला आहे.
नुकतीच नसरुल्लाहने पाकिस्तानच्या एका चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने भारतात अंजूच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर, अंजूने आता माझ्याशी निकाह केल्यामुळे पाकिस्तान सरकार आम्हाला एक घर देणार असून अंजूला देखील नोकरी मिळवून देणार असल्याचे नसरुल्लाहने सांगितले आहे. तसेच अंजूला पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात येणार असल्याची माहिती नसरुल्लाहने दिली आहे.
मुख्य म्हणजे, “काही दिवसांमध्ये अंजू आपल्या मुलांना भेटण्यासाठी भारतात येणार आहे. या मुलांना घेऊन ती पुन्हा पाकिस्तानला जाणार आहे. मात्र अंजू पाकिस्तानातून भारतात गेल्यानंतर ती परत आली नाही तर तिला घेऊन येण्यासाठी मी स्वत: भारतात जाईल. पण आम्हालाही भीती आहे की, अंजू भारतात आल्यानंतर तिची हत्या करण्यात येईल. तसेच मी भारतात आल्यानंतर माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो” असा दावा नसरुल्लाहने केला आहे. तिच्या मुलांचे धर्मांतर करणार करण्याचा आमचा विचार नाही. तसेच तिच्यावर देखील धर्मांतरासाठी कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता” असे नसरुल्लाहने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये राहणारी अंजू आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तिने भारतात राहून पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिजा पासपोर्ट सर्व काही काढून घेतले होते. घरातून निघताना तिने बाजारात चालले असल्याचे आपल्या नवऱ्याला सांगितले होते. मात्र ती थेट पाकिस्तानला गेली असल्याची माहिती तिच्या नवऱ्याचा प्रसार माध्यमांमधून समजली. आता अंजूने प्रियकर नसरुल्लाहशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते.