राष्ट्रीय महामार्ग ६१वर झालेल्या अपघातात दोघां तरुणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर दुचाकीवरून गावाकडे परत येत असलेल्या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्हातील माजलगाव हद्दीत हा अपघात घडला. मृतांमध्ये पाथरी तालुक्यातील किन्होळा येथील ग्रामपंचायत सदस्यासह आणखी एका तरुणांचा समावेश आहे.

पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या किन्होळा येथील दीपक अच्युतराव कनसे (वय ३० वर्षे) आणि युवराज सुभाषराव मगर (२५ वर्षे) दोघेही राहणार किन्होळा हे दोघेजण दवाखान्याच्या कामानिमित्त २९ जानेवारी रोजी सकाळी माजलगावला गेले होते. रात्री माजलगाववरून परत येत असताना या दोघांच्या मोटरसायकलला राष्ट्रीय महामार्ग ६१ वर पाथरी माजलगाव दरम्यान अपघात झाला.

या अपघातामध्ये दीपक आणि युवराज दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान रात्री उशिरा दीपक कणसे यांच्या कुटुंबियाने त्यांच्या मोबाईल वर कॉल केला असता ,घटनास्थळी पोलिसांनी फोन उचलल्याचे घटनेची माहिती त्याना मिळाली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी