WhatsApp ला गुलाबी रंगात बदलण्याचा दावा करणाऱ्या ‘मेसेज’मध्ये Virus, यामुळे ‘हॅक’ होऊ शकतो तुमचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सायबर तज्ज्ञांनी आपल्या फोनवर एक लिंक पाठवली जात आहे. त्या लिंकच्या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या लिंक मध्ये दावा करण्यात येत आहे कि तुमचे व्हाटसअ‍ॅप गुलाबी रंगाचे होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील.

जर तुम्ही त्या लिंक वर क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो
सायबर तज्ज्ञांच्या मतानुसार या लिंक मध्ये दावा करण्यात आला आहे कि तुमचे व्हाटसअ‍ॅप अपडेट होऊन ते गुलाबी रंगाचे होईल. त्यामध्ये तुम्हला अनेक सुविधा देखील मिळतील. जर तुम्ही चुकून त्या लिंकवर क्लिक केले तर तुमचा मोबाईल हॅक होईल.

व्हाटसअ‍ॅप पिंक या नावाने आलेल्या कुठल्याही लिंक वर क्लिक करू नका
सायबर सुरक्षा विशेषज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावरद्वारे सांगितले कि, व्हाटसअ‍ॅप संदर्भात सावधान ! एपीके डाऊनलोड लिंक सोबत वायरस पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही व्हाटसअ‍ॅप पिंक या नावाने आलेल्या कुठल्याही लिंक वर क्लिक करू नका. जर तुम्ही या लिंकवर क्लिक केले तर फोनचा वापर करणे अवघड होईल.

गुगल किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅपस्टोर व्यतिरिक्त कोणत्याही लिंकद्वारे अन्य कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका
सायबर सुरक्षेशी संबंधीत कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन म्हणाले कि, सध्या वापरकर्त्यांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी गुगल किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅपस्टोर व्यतिरिक्त कोणत्याही लिंकद्वारे अन्य कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका.

जर एखाद्याला संशयास्पद मेसेज किंवा ई-मेलसह काही मेसेज आला तर त्यास उत्तर देण्यापूर्वी तो संपूर्ण तपासून घ्या
व्हाटसअ‍ॅपने सांगितले कि जर एखाद्याला संशयास्पद मेसेज किंवा ई-मेल आला तर त्याला उत्तर देण्यापूर्वी तो संपूर्ण तपासून घ्या आणि सतर्क राहा. तसेच व्हाटसअ‍ॅपने सल्ला दिला कि आम्ही ज्या सुविधा दिल्या आहेत, त्यांचा वापर करा, आम्हाला रिपोर्ट पाठवा, संपर्काबाबत माहिती द्या किंवा त्यास ब्लॉक करा.