आरसीबी आयपीएल जिंकेल, पण त्यांना ‘या’ संघाला हरवावं लागेल – मायकल वॉन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विराट कोहली च्या नेतृत्वाखाली यंदा रॉयल चॅलेंजर बंगळुरूची गाडी सुसाट धावत आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अपयशी ठरलेला हा संघ यंदा तरी आयपीएल चषक जिंकणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण नॉक आउट्समध्ये त्यांना पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सचा अडथळा दूर करावा लागणार आहे. ‘बर्‍याच वर्षांपासूनच ही सर्वोत्तम संतुलित आरसीबी आहे. हे त्यांचे वर्ष असू शकते!!! नॉकआउट्समध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला तरच!’ असं ट्विट वॉन यांनी आरसीबीच्या सलग तिसऱ्या आयपीएल विजयानंतर केले.

दरम्यान यंदा रॉयल चॅलेंजर बंगळुरू अद्याप एकही सामना गमावलेला नाही. विराट कोहली , ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीविलीर्स यांनी धडाकेबाज खेळ्या करत आत्तापर्यंत आरसीबीला तारले आहे. प्रथमच रॉयल चॅलेंजर बंगळुरू चा संघ मजबूत दिसत आहे.

 

You might also like