दिल्ली | अभिनन्दन वर्थमान यांची पाक लष्कराने सुटका केली आहे. तब्बल ६० तासानन्तर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सोशल मिडियावर भारतीयांनी पिंजऱ्यातून वाघ परत आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या ९: १७ वाजता वाघा बोर्डर वरुन त्यांचं भारतात आगमन झाल आहे. वाघा बॉर्डर वर यावेळी त्यांच् जल्लोषात स्वागत करण्यात आल. भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी वाघा परिसर दनानुन सोडला.
भारत भूमिवर पाय ठेवताच अभिनंदन यांना भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी त्याच स्वागत केल. सुटका केल्यानन्तर अभिनन्दन यांना लष्करी ताफयात विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले. वाघा बॉर्डर चे अधिकारी कागदपत्रांची पूर्तता करत असतांना थेट प्रक्षेपण पाक वृत्तवाहिन्यांकडुन दाखवण्यात आल त्यावेळी अभिनन्दन यांच्या चेहर्यावर समाधान जाणवत होतं.
वर्थमान यांचं विमान हे २ दिवसांपूर्वी युद्ध चकमकित पाक सीमेपार गेल होतं. पाक च्या ताब्यात गेल्यावर देशभरातून त्यांच्या साठी प्रार्थना होत होती आणि सरकारवर भारतीयांचा दबाव वाढत होता.
या निमित्ताने देशभरात जल्लोषाच वातारण निर्माण झाल आहे.