देशात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख पार; गेल्या २४ तासांत आढळले ६८,८९८ नवे रुग्ण

मुंबई । देशात करोनाबाधितांच्या प्रमाणात सातत्याने दुसऱ्या दिवशी वाढ झालेली पहायला मिळली. त्यानुसार, शुक्रवारी कोरोनाची ६८,८९८ नवी प्रकरणं समोर आली. तर ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बाधित रुग्णांची संख्या २९ लाखांच्या पार पोहोचली आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे. यापैकी ६,९२,०२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील २१,५८, ९४७ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे

मागील २ आठवड्यांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा स्थिरावताना दिसत होता. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ६० हजारापर्यंत मर्यादित होता. मात्र, काल आणि आज नव्या रुग्णांच्या आकड्याने पुन्हा एकदा ६५ हजारांची वेस ओलांडली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या १३,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात २० ऑगस्टपर्यंत एकूण ३ कोटी ३४ लाख ६७ हजार २३७ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यांपैकी गुरुवारी एका दिवसांत ९,१८,४७० नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com