आधी ‘ती’ कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा! मनसेची आक्रमक मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे.

परंतु, आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, असं ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६८,८९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे. यापैकी ६,९२,०२८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशातील २१,५८, ९४७ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”